101 Best Marathi ukhane for male पुरुषांना साठी मराठी उखाणे

लग्न म्हंटल कि मराठी उखाणे आलेच मग Marathi ukhane for male आहे ना आपली परंपरा आहे. नवरी असो कि नवरदेव मराठी उखाणे ग्यावेच लागत तर मग तुमच्या साठी आहे हे Marathi ukhane अगदी सोपे आणि लक्षात राहणातरे Marathi ukhane for mens.

Latest marathi ukhane. नवीन मराठी उखाणे आहे नक्की पहा. 

Marathi ukhane for mens हे marathi ukhane तुम्ही कुठंही वापरू शकतात लग्नात पण तुम्ही हे marathi उखाणे वापरू शकता आपले मराठी उखाणे खूप सोपे आहे Marathi ukhane for male संग्रह आहे Marathi ukhane for mens हा संग्रह खूप सोपा आहे. मराठी उखाणे आपण खूप सोपे अ लक्षात राहणारे देतो. Marathi ukhane वाचलं तर वेडे व्याल अगदी सोपे. मराठी उखाणे पुरुषांना साठी आहे.
#marathiukhaneformale

              काही शब्द येतात ओठातून, …… चं
                      नाव येतं मात्र हृदयातून

              कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
              मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

          भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची

                पुरणपोळीत तुप असावे साजुक,
             ……. आहेत आमच्या फार नाजुक.

     लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम
       …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम

                     गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
                   ……. आहे माझी ब्युटी क्वीन

             संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
                 ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

                नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
               ……..झाली आज माझी गृहमंत्री.
                          मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
                …….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

           मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
              …….चे बरोबर बांधली जीवन गाठ.


=सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,....मला मिळाली आहे अनुरूप.

=दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

=जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

=पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

=ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

=एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

=सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, …………. चे नाव घेतो……..च्या घरात.

=निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

=चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

=रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.

=जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.







=हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.

=सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल..

=कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.

=संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.

=दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

=श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.

=… माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.

=जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.

=उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.

=रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.

=सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, … मिळाली आहे मला अनुरुप.

=निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

=सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग.

=मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

=राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास.

=जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

=जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार.

=अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.

=जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.

=हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.

=चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

=निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.

=पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, … ला आवडते नेहमी दुधावरची साय.

=संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.

=नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, … आहे माझे जीवन-सर्वस्व.

=रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.

=पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.

=हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

=मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.

=शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.

=नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, .. चे रुप आहे अत्यंत देखणे
.
=भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, … चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

=बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.

=ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.

=आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, …चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान.

=देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.

=देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, … माझ्या जीवनाची सारथी.

=स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान.

=काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद.

=अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

=देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, … शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

=श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, … ला सुखात ठेवीन हा माझी पण.

=नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, … राणी माझा तळहाताचा फोड.

=देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन..

=भाजीत भाती मेथीची, … माझी प्रितीची.

=दही चक्का तुप, … आवडते मला खुप.

=हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, … झाली आता माझी सहचारिणी.

=आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.

=आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.

=श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन.

=चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, … रावाच्या जीवावर … मारते मौजा.

=सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.


#Marathiukhane  अशाच नवीन उखाणे साठी आपली वेबसाईड  share करून ठेवा


Post a Comment

0 Comments