101 Best Marathi ukhane for male and female | लग्नासाठी मराठी उखाणे

लग्न म्हंटल कि मराठी उखाणे आलेच मग Marathi ukhane for male and female आहे ना आपली परंपरा आहे. नवरी असो कि नवरदेव मराठी उखाणे ग्यावेच लागत तर मग तुमच्या साठी आहे हे Marathi ukhane अगदी सोपे आणि लक्षात राहणातरे Marathi ukhane for male and female
Marathi ukhane for male and female हे marathi ukhane lagnasathi तुम्ही कुठंही वापरू शकतात लग्नात पण तुम्ही हे marathi उखाणे वापरू शकता आपले मराठी उखाणे खूप सोपे आहे Marathi ukhane for male संग्रह आहे marathi ukhane for male and female हा संग्रह खूप सोपा आहे. मराठी उखाणे आपण खूप सोपे अ लक्षात राहणारे देतो. Marathi ukhane वाचलं तर वेडे व्याल अगदी सोपे. मराठी उखाणे पुरुषांना साठी आहे.
#marathiukhaneformaleandfemale



Top 100 marathi ukhane


रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन---------- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी--------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी

शिंपल्यात सापडले माणिक मोती------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी

महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस

आंनदाने भरला दिन हा लग्नाचा----- रावांना घास देते गोड जिलेबीचा

मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स


आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी


सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी


सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण


सासरचे निराजंन माहेरची फुलवात----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने


माहेर जणू गंगा, सासर जणू सागर त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर


आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश

पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती

सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार

मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती

गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद----- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात

सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी----- रावांचे नाव घेते ------ च्यावेळी

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा----- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी----- रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी

रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा-----रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा

नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा----- रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा

मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार----- रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी----- रावांच्या जीवनात आहे मला गोडी

सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात----- रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची----- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची

जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले----- रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान----- रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान

कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने

सुखी संसारात हवी विश्वासाची जोड----- रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री आजपासून मी झाले ----- रावांची ग्रुहमंत्री

चंद्राचा उदय, समुद्राला भरती----- रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती

अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य----- रावांचा आनंद हेच माझे सौख्य

मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार----- रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार

आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे----- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे

नीलवर्ण आकाशात चमकतात तारे----- रावांचे नाव घेते लक्ष दया सारे

सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला----- रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला

पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून----- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन

लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा----- रावांसाठी जीव झाला माझा वेडा

मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर----- रावांचा सहवास लाभो जन्मभर

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी जीवनाचे पूष्प वाहिले ----- रावांच्या चरणी

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी----- राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा----- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर आयुष्याचा प्रवास करीन ----- रावांच्या बरोबर

सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह

आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस-----राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

संसार सागरात प्रीतीच्या लाटा----- रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा

साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज----- रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज

फुलात फुल जाईचे फुल----- रावांनी घातली मला भूल

इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर---- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर

खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड----- रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड

इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून----- रावांचे नाव घेते ----- ची सून

सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले----- रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले

घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस----- रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस

पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप----- रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज

सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास----- रावांना देते मी जिलेबीचा घास

चंदनाच्या झाडावर बसला मोर----- रावांच्या जीवावर मी आहे थोर

नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण----- रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण

शब्द तिथे नाद कवी तिथे कविता----- रावांची जोड जणू सागर आणि सरिता

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली----- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा----- रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा

संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान----- रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान


माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन----- रावांच्या संसारात मन घेते वळून

लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी----- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी

आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण----- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण

पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात

चांदीच्या ताटात पक्वानांची रास----- रावांना देते लाडूचा घास

रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते लाडूचा गोड घास ----- रावांना देते

रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते लाडूचा गोड घास ----- रावांना देते

मंगळागौरीची पूजा मनोभावे करते----- रावांसाठी दीर्घायुष्य मागते

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल----- रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल

नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर----- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर

उंबरठयावरचं माप पायांनी लोटते----- रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते


आई, बाबा येते आशीर्वाद दयावा----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा

मोत्याची माळ, सोन्याचा साज----- रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज

मंगळागौरी माते नमन करते तुला----- रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला

दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती----- रावांना ओवाळते मंगल आरती


थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा----- रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा----- रावांच्या संसारात लावीन दिप नवा

संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल----- रावांना लागली बाळाची चाहूल

फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे----- रावांच्या बाळाचे आज आहे बारसे

गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज----- रावांच्या बाळाची आज आहे मौंज


गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष----- रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष


सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या सोनार घडवी दागिने ----- रावांच्या बाळाला

वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर----- रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र----- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा-----रावांच्या नावावर भरते लग्नचुडा

आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात----- रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात

शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध----- रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद

जीवनात ही घडी अशीच राहू दे----- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे


संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती----- रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात----- रावांचे नाव घेते माझ्या मनात

श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान----- रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान

निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला----- रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन------- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन









Post a Comment

0 Comments