Marathi ukhane for female लग्न समारंभ म्हणलं कि मराठी उखाणे आलेच मराठी उखाणे शिवाय मजाच नाही नावरदेवचे उखाणे झाल्या वर येते नवरीचे उखाणे मग Marathi ukhane for female संग्रह तुमच्या साठी आहे नवरी साठी मराठी उखाणे आहे याच्यात Marathi ukhane for female वाचा नवीन मराठी उखाणे आहे. Latest marathi ukhane for फेकले
खाली नवरीचे मराठी उखाणे आहे नवीन उखाणे आहे सगळे
लग्नात मराठी उखाणे शिवाय मज्जाच नाही उखाणे ग्यावेच लागतात मग आपली वेब साईट आहे मराठी उखाणे साठी
नवरदेव चे उखाणे पण आहे Marathi ukhane for men असा पण संग्रह आहे
हा आपला नवरीचे उखाणे चा आहे Marathi ukhane for female तर हा संग्रह आवडला तर नक्की कंमेंट करा
मायशा माझी मांजर मी तिचा बोका
नाव घेऊन आशीर्वाद मागते
नाव ह्ळुच ओठी येई
नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
नांव घेते, ऐका सारे जण.
नांव घेते, सारे जण बसा.
नांवाचा, भरला हिरवा चुडा
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
=गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, .. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.
=माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, .. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
=पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
=मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.
=सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.
=कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
=मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
=अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, … रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.
=पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
=लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.
=ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.
=कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, … रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
=शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.
=श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.
=यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.
=पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, … रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.
=सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.
=राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, … रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.
=श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, … रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.
=जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, … रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.
=वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
=जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, घडविले देवानी… रावांना जीव लावून.
=पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, … रावांनी आणला मला मोग-याचा गजरा.
=चांदीचे जोडवे पतीची खुन, .. रावांचे नांव घेते,… ची सुन.
=दारी होता टेबल, त्यावर होता फोन, … रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?
=अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.
=गुलाबाचे फुल दिसायला ताजे, … रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे
=डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, … रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.
=ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला, … रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.
=डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, .. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
=हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. … रावांचे नांव घेते… च्या दिवशी.
=वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, …रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,
=दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे, … रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.
=नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे, …रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
Marathi ukhane for female आवडले असेल तर नक्की share करा
❤धन्यवाद ❤
0 Comments