modern marathi ukhane for female) घेण्याचा आग्रह केला जातो. तर मग हे मराठी उखाणे (marathi ukhane for female ). दारात नणंद आणि सासरच्यांकडून तिला गृहप्रवेश करताना थांबवून उखाणा (Marathi Ukhane For Female) घेण्यास सांगितला जातो. 


कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले.

पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
…. च्या साथीने आदर्श संसार करीन.

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

इंग्रजीत म्हणतात मून,
…. चंं नाव घेते …. ची सून.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
…. चं नाव घेते कुंकू लावून.

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.

चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची सून.

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.

बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!

अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!